अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतांना दिसत आहे. जिल्हयात आजही १ हजाराहून अधिक नव्या रूग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत ११०० ने वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये ३३२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९५ आणि अँटीजेन चाचणीत ३७३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९०, अकोले ०४, जामखेड ४०, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०७, पारनेर ०६, जामखेड ४०, पाथर्डी ०१, राहता १७, राहुरी ११, संगमनेर २७, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १५, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५६, संगमनेर ४१, राहता ३३, कोपरगाव १२, अकोले १३, शेवगाव ०९, श्रीरामपूर ४६, नगर ग्रामीण ३०, पारनेर ०९, जामखेड ०१, पाथर्डी ०६, राहुरी १६, नेवासा ०६, श्रीगोंदा ०२, इतर जिल्हा ०४, कर्जत ०४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३७३ जण बाधित आढळुन आले. मनपा ५३, संगमनेर ३२, राहता १४, कोपरगाव ०५, अकोले ४५, शेवगाव २९, श्रीरामपूर १८, नगर ग्रामीण ०७, पारनेर १२, जामखेड ३०, पाथर्डी ११, राहुरी २३, नेवासा १४,श्रीगोंदा १०, कर्जत ०२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ६८ अशा रुग्णांचा समावेश आहे.