जिल्ह्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या पाचशे आत; वाचा आजची आकडेवारी

जिल्ह्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या पाचशे आत; वाचा आजची आकडेवारी

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र रुग्णसंख्येत घट झाली असली तरी नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ४६१ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १०९, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत २२७ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १२५ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे किती रुग्ण?

पारनेर - ६४

संगमनेर - ५०

श्रीगोंदा - ४२

कोपरगाव - ३४

राहाता - ३४

शेवगाव - ३१

नेवासा - २८

राहुरी - २७

पाथर्डी - २६

नगर ग्रामीण - २५

श्रीरामपूर - २१

अकोले - १९

कर्जत - १७

इतर जिल्हा - १५

मनपा - १४

जामखेड - १३

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०१

Related Stories

No stories found.