Corona Update : जिल्ह्याच टेन्शन कायम, करोनाचे रुग्ण काही कमी होईना!

आज किती नवे रुग्ण?, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?
Corona Update : जिल्ह्याच टेन्शन कायम, करोनाचे रुग्ण काही कमी होईना!
Corona

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी सातशेहून अधिक नव्या रुग्णांची वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ७६२ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १७६, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३५८ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २२८ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर - १५२, पारनेर - ९५, श्रीगोंदा - ८०, राहाता - ७०, कर्जत - ६१, शेवगाव - ४८, नगर ग्रामीण - ४०, नेवासा - ३९, मनपा - ३२, अकोले - २८, पाथर्डी - २६, श्रीरामपुर - २६, राहुरी - २३, जामखेड - १७, इतर जिल्हा - १४, कोपरगाव - ०९, भिंगार काँटेंमेंट - ०१, मिलिटरी हॉस्पिटल - ०१

Related Stories

No stories found.