अस्तगाव (वार्ताहर) - पिंपळस येथे ग्रामपंचायतच्या वतीने गावातील पंचेचाळीस वर्षापुढील वयोगटातील 87 नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. ते सर्व निगेटिव्ह आले. त्यात 60 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
डोर्हाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत या चाचण्या करण्यात आल्या. या नागरिकांना पहिल्या लसीकरणासाठी टोकन देण्यात आले. डोर्हाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हा पहिला प्रयोग करण्यात आल्याची माहिती सरपंच नंदाताई दत्तात्रय घोगळ यांनी दिली. टोकण दिल्याने या नागरिकांना गर्दीत रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. करोना तपासण्या केल्याने त्या सर्व निगेटिव्ह आल्याने गावात समाधानाचे वातावरण असल्याचे सरपंच नंदाताई दत्तात्रय घोगळ यांनी सांगीतले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकिय अधिकरी डॉ. संजय गायकवाड, डॉ. विजय गायकवाड, एएनएम भांड, आरोग्य सेवक मोरे, आशा सेविका रंजनाताई कापसे, भारतीताई चुळभरे व श्रीमती गायकवाड यांचे सहकार्य मिळाले. आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.
भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रतिमेचे पुजन सरपंच नंदाताई घोगळ, अण्णासाहेब निरगुडे, यादव वाघमारे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय चंद्रभान खापटे, भरत लोखंडे, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस दिलीप वाघमारे, बाबासाहेब वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य अमोल भोसले, अरुण निरगुडे, शाम वाघमारे, पाणी पुरवठा अध्यक्ष तानाजी चुळभरे, पोलीस पाटील बाळासाहेब वाघमारे, भगीरथ कुदळे, अंबादास कुदळे, ग्रामपंचायत सदस्य सागर कापसे, नितीन वाघमारे, दिगंबर तांबे, किशोर वाघमारे, गोविंद वाघमारे, अक्षय वाघमारे, चांगदेव वाघमारे, किरण वाघमारे, अंकुश निमसे यांनी भेट दिली. ग्रामसेविका वैशाली तोडमल आणि दत्तात्रय घोगळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आणि सर्वाचे आभार मानले.