करोना टेस्टींग व लसीकरणासाठी ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी

सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
करोना टेस्टींग व लसीकरणासाठी ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

करोनाने धास्तावलेल्या राहाता तालुक्यातील नागरिकांची ग्रामीण रूग्णालयात टेस्टींगसाठी तोबा गर्दी.

सोशल डिस्टंसिंगचा फजा उडाला असून कमी कर्मचार्‍यात काम करताना वेद्यकीय कर्मचार्‍यांची तारांबळ उडत असून मदतनीस नेमलेले शिक्षक दवाखान्याकडे फिरकलेच नसल्याने कारवाई करन्णचा तहसिलदारांनी दिला इशारा.

गेल्या महिन्याहून अधिक दिवसापासून राहाता तालुक्यातील सुमारे 40 हुन अधिक गावात करोनाने पाय पसरविले असून सर्वाधिक रूग्ण राहाता शिर्डी, लोणी व प्रवरा पट्टयात सापडत असून करोना टेस्टींगसाठी सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. राहाता ग्रामीण रूग्णालयात शिर्डी व राहाता येथील रूग्ण तपासणी केले जातात.

मात्र साकुरी, पिंपळस, पिंपळवाडी, नपावाडी, एकुरखा, दहेगांव आदी गावातील मोठ्या संखेने संशयीत रूग्ण तपासणीसाठी येत असल्याने मोठी गर्दी होत असून गर्दी नियंत्रीत करण्यासाठी मनुष्यबळ येथे नसल्याने सोशल डिस्टंसिंगचा येथे फज्जा उडताना दिसून येत आहे.

मोजका एक डॉक्टर व तिन सहकारी यांच्यावर सर्व टेस्टींग चालु असून रूग्णालयात पूर्ण क्षमतेचा स्टाफ नसल्याने आहे त्या अधिकार्‍यांवर मोठा तान पडत असून रोज रोज कोरोना टेस्ट व कोवीड लसीसाठी रूग्णालयात सरासरी 400 हुन अधिक जण येतात. त्यांच्या सोबत तेवढेच नातेवाईकासोबत येतात.

त्याचबरोबर इतर आजाराची ओपीडी, मयतांचे शवविच्छेदन यामुळे रूग्णालयातील स्टॉफची सर्कस सुरू असून रिक्त जागा तातडीने भरण्याची गरज आहे. तसेच एक पोलीस व होमगार्ड येथे नेमण्याची गरज असल्याचे सामाजीक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सांगितले. तुपे हे गेल्या पाच दिवसापासून रोज दोन तिन तास टेस्टींग विभागात मदत करत आहे.

मदतीसाठी नेमलेले शिक्षक फिरकलेच नाही

लसीकरण व करोना टेस्टसाठी नाव लिहणे, रूग्ण कोनत्या गावातील त्याच्या याद्या बनविणे, यासाठी तहसिल कार्यालय सुरू करण्यात आलेल्या वॉर रूम मार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रावर चार ते पाच शिक्षकांच्या नेमणूक केल्या होत्या. तसा आदेशही संबधीत शिक्षकांना काढण्यात आला होता. मात्र राहाता ग्रामीण रूग्णालयात एकही शिक्षक न फिरकल्याने 15 तारखेपर्यंत संबधीत शिक्षक हजर न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com