पारनेर तालुक्यातील 71 गावे संवेदनशील

गावामध्ये आज पूर्णपणे बंद : लग्न सोहळ्यात होणार करोना चाचणी शिबिर
पारनेर तालुक्यातील 71 गावे संवेदनशील

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर (Parner) तालुक्यातील वाढता करोनाचा प्रादुर्भाव (Covid 19 outbreaks) लक्षात घेता, तसेच शनिवारी नव्याने 111 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आल्याने तालुक्यातील 71 गावे संवेदनशील गावे जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devre) यांनी दिली असून या गावांमध्ये आज (रविवारी) कडक निर्बंध लागू केले असून दोन दिवसांमध्ये या गावातील नागरिकांच्या करोना चाचण्या (Covid 19 Testing) करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

तालुक्यातील कळस, सारोळा, अडवाई, गाडिलगाव, जातेगाव, वडगाव सावताळ, वासुंदे, देवीभोयरे, मांडवे, कुरुंद, पारनेर, काकणेवाडी, वनकुटे, धोत्रे, पिंपळगाव रोठा, धोत्रे हकीकतपुर, निघोज, जवळा, पिंप्री जलसेन, कुरुंद, जातेगाव, सुपा, जामगाव, शहांजापुर, टाकळी ढोकेश्‍वर, वडगावगुंड, हिवरेकोर्डा, नारायणगव्हाण, नांदुरपठार, सावरगाव, वासुंदे, गाडीलगाव, वाळवणे, वाडेगव्हाण, पठारवाडी, गुणोरे, वडझिरे, ढवळपुरी, काळकुप, वडुले, कर्जुलेहर्या, पोखर, पाडळी, आळे, भांडगाव, वडगाव, आमली दैठणे गुंजाळ, वडनेर, मोरवाडी, कोहोकडी, यादववाडी, कडुस, वडनेर, हवेली, विरोली, चिंचोली, रायतळे, वनकुटे, रेवाडी, बाभुळवाडी, धोत्रे खुर्द, ढोकी, सांगली, सुर्या म्हसे, हत्तलखिंडी, कारेगाव, लोणी हवेली, भोंद्रे, वारणवाडी, गाजदीपुर, खडकवाडी, पळशी, तास या गावांचा संवेदनशील गावे म्हणून तहसीलदार देवेरे यांनी समावेश केला आहे.

या गावातील शासकीय कर्मचारी (Government employees) यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडु नये, अशा सूचना दिल्या असून बाहेरून आलेले पाहुणे 10 दिवस प्राथमिक शाळेत ठेवावे, पॉझिटिव्ह व लक्षणे नसलेले रुग्ण कोविड केअर सेंटर अथवा शाळेत ठेवावे. या ठिकाणी आज पूर्णपणे बंद पाळावा. आज व उद्या या दोन दिवसात किमान 400 रॅपिड व 150 आरटीपीसीआर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी तालुकास्तरीय समिती भेट देणार आहे. गावात अनुपस्थित असणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांचा अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडेस सादर करुन कारवाई करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त चाचणी करून गावातील तिसरी लाट तात्काळ थांबवायची आहे.

अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. रविवारी मोठ्या प्रमाणावर लग्न आहेत. प्रत्येक मंडळ अधिकारी यांनी त्या ठिकाणी कर्मचारी नेमून लग्न समारंभाचे व्हिडीओ शुटींग (Video shooting of the wedding ceremony) करावे. 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लग्नठिकाणी चाचणी शिबिर लावून वर्‍हाडी मंडळी तपासणी केल्याशिवाय मंडपात सोडू नये. नवरदेव-नवरी यांचीही तपासणी जवळचे नातेवाई व भटजी, आचारी यांचीही तपासणी करावी. तपासणी करु न दिल्यास कळवावे. 1 ते 50 प्रवेश संपल्यानंतर कुणाला प्रवेश देऊ नये, स्थानिक पोलिस, मित्र स्वंयसेवक निवृत्त सैनिक सुट्टीवर आलेला सैनिक यांची मदत घ्यावी, अशा सूचना तहसीलदार देवरे यांनी केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com