अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाची सविस्तर आणि स्वतंत्र नियमावली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी जारी केली आहे.

यात करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचा समावेश आहे. विशेष पूर्वनियोजित विकेंड लग्न समारंभासाठी आणखी निर्बंध कडक करण्यात आले असून यात ज्या ठिकाणी लग्न समारंभ आहे, या अशा ठिकाणी मंगल कार्यालयाशी निगडीत सर्व कर्मचार्यांना करोनाचे दोनही डोस अथवा करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह सक्तीचा करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काढलेल्या आदेशात राज्य सरकारचे नियम सविस्तर नमुद करण्यात आलेले आहेत. यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व बंद राहणार आहे. यासह सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

मात्र, यात रुग्णालय, वैद्यकीय सेवा, किरणा माल, भाजीपाला, दुग्धालये, बेकरी, अन्न पदार्थ दुकाने यासह सार्वजनिक वाहतूक ठरवून दिलेल्या नियमानूसार सुरू राहणार आहे. यासह सर्व उद्याने, सार्वजनिक क्रीडांगणे सोमवारी ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत.

यासह दुकाने, मार्के आणि मॉल्स हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. मात्र, त्यासाठी नियमावली लागू करण्यात आलेली आहे. खासगी वाहतुकीला नियम लावण्यात आलेले आहेत. यासह मनोरंजन व करमणूक साधने, रेस्टॉरंटस, बार, हॉटेल, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत.

यासह रस्त्याच्याकडे खाद्य पदार्थ विक्री बंद राहणार असून उत्पादन क्षेत्राला कडक अटी टाकण्यात आलेल्या आहेत. बांधकाम स्थळावर राहणार्या मजुरांना अडचण नसली तरी बाहेरून मजुरांची येजा करता येणार नाही. हे कडक निर्बंध 30 एप्रिलपर्यंत राहणार आहेत.

ज्या उत्पादनामध्ये निव्वळ ऑक्सिजनच कच्चा माल आहे. अशा उत्पादन तयार करण्यास 10 एप्रिलपासून बंदी राहणार आहे. मात्र, ज्या हे उत्पादन करणे गरजेचे आहे. त्यांनी सबळ पुराव्यासह संबंधीत प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी, तसेच ऑक्सिजनचा उत्पादनातील 80 टक्के वाटा हा वैद्यकीय आणि औषध निर्माण यासाठी करण्यात आलेला आहे.