करोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

राहाता तालुका प्रशासन अलर्ट
करोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

विदेशातील कोवीड-19 संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे राहाता तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे. नागरिकांनी कोवीड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.

आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये कोविड-19 या प्रादूर्भाव होऊ नये. याकरिता सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी व्यक्तींनी एकमेकांमध्ये कमीत कमी 6 फूट अंतर ठेवावे, हात नियमितपणे साबण व पाण्याने धुवावेत अथवा सॅनिटायजरचा वापर करावा, आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा.

ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, जुलाब इ. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रास भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण तात्काळ करून घ्यावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे.

शासनाकडून व आरोग्य विभागाकडून देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करावे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक चांगला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता कोवीड अनुरूप वर्तन व सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही राहाता गटविकास अधिकारी जे.बी.पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय घोलप यांनीही केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com