लगीन घरात...कोरोना जोरात ; नवरा-नवरीसह तारकपूरचे 9 पॉझिटिव्ह
सार्वमत

लगीन घरात...कोरोना जोरात ; नवरा-नवरीसह तारकपूरचे 9 पॉझिटिव्ह

वर्‍हाडी मंडळीही हादरली

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नगर टाइम्स

अहमदनगर (प्रतिनिधी) - गत पंधरवड्यात लग्न झालेल्या तारकपूरमधील कुटुंबाला कोरोनाने घेरले आहे. नवरा-नवरीसह तब्बल 9 जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका लगीन घरात सहा तर नातेवाईकाच्या घरातील तिघांना कोरोनाची बाधा झाली. पॉझिटिव्ह निघालेल्या रिपोर्टने आता वर्‍हाडी मंडळीही हादरली आहेत.

तारकपूरमधील व्यावसायिकाच्या मुलाचे लग्न गत पंधरवड्यात झाले. नगरमधीलच एका हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. ज्याच्या कुटुंबात लग्न झाले त्या कुटुंबाचे नातेवाईक नगरमध्येच राहतात. त्या कुटुंबातील तिघे बाधित झाले आहेत. लगीनघरातील सहा जण पॉझिटिव्ह निघाले. नवरदेवाचे पिताश्रींनाही कोरोनाची लागण झाली आहे.

पॉझिटिव्ह निघालेल्या एकाचे तारकपूरमध्ये जनरल स्टोअर्स आहे. लग्न सोहळ्यानंतर ते व्यावसाय करत होते. या काळात ते किती जणांना भेटले याचाही शोध घेतला जावा अशी मागणी आता पुढे आली आहे.

नवरदेव-नवरीसह लगीन घरात नऊ जणांना कोरोना झाल्याने वर्‍हाडीही चिंतेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हॉटेलात हा विवाह सोहळा झाला असला तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले की नाही यावर इतरांचे रिपोर्ट डिपेंड असल्याचे सांगण्यात आले.

पाच पुरुष, चार महिला बाधित

लग्न सोहळ्यानंतर कुटुंबातील एकाला त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनी स्वत:हून टेस्ट करून घेतली. त्यात ते पॉझिटिव्ह निघाले. त्यानंतर इतरांनीही कोरोना टेस्ट केली. त्यात तब्बल 9 जणांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले. पाच पुरूष व चार महिलांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com