
अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसापासून सातत्याने जिल्ह्यात वाढत असलेल्या करोना रुग्ण यांच्या संख्या विचारात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयातील प्रसृती विभागात आता नव्याने 25 बेडचे आयसीयू (अतिदक्षता विभाग) उभारण्यात येत आहे.
या विभागाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन दिवसांत ते कार्यान्वित होणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. खासदार डॉ. सुजय विखे यांनी मंगळवारी या प्रस्तावित आयसीयूच्या कामाची पाहणी करत सुचना दिल्या.