श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वैद्यकीय अधिकार्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्याचे काम चांगले नाही.

करोना प्रतिबंधक योजनेत श्रीरामपूर नापास असल्याचे सांगून करोनाला प्रतिबंध करणे ही सर्वांची जबाबदारी असून हलगर्जीपणा करणार्यांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलिसांनी रस्त्यावर उतरुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

श्रीरामपूर येथील कोरोना आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. योगेश बंड, एसटीचे आगारप्रमुख राकेश शिवदे, डॉ. सचिन पर्हे आदी उपस्थित होते.

प्रारंभी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी करोना प्रतिबंधात्मक कारवाई बाबत माहिती दिली. तर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांनी आरोग्य विभाग, महसल, पोलीस, नगरपालिका, पंचायत समिती आदी विभागांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

यावेळी कोणालाही समाधानकारक उत्तर न देता आल्याने जिल्हाधिकार्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, करोनाच्या बाबतीत श्रीरामपूर तालुका जिल्ह्यात हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत असून श्रीरामपूर तालुक्याचा मृत्युदर जिल्हा व राज्याच्या दुप्पट आहे. जर काळजी घेतली नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर जाईल. नियमांचे उल्लंघन करणार्या लोकांवर कडक कारवाई करावी.

थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या कराव्यात जर ते येत नसतील तर त्यांना उचलून आणून चाचण्या कराव्यात. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील दोन महिने सतर्क रहावे लागेल, श्रीरामपुरात आरोग्य,पोलीस व प्रशासकीय यंत्रणेमध्ये योग्य समन्वय नसल्याने करोना प्रतिबंधक योजनेत श्रीरामपूर नापास झाले असून योग्य काम न करणार्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

करोना रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या तपासण्या वाढवा, जेथे जास्त रुग्ण सापडतात परिसर बंद करा, लसीकरण वाढवा. रस्त्यावर उतरून कार्यवाही करावी. मास्क बाबत कारवाई करा, करोनाला प्रतिबंध करणे ही सर्वांची जबाबदारी असून हलगर्जीपणा करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यकार्यकारी क्षीरसागर यांनी तर श्रीरामपूर तालुका जिल्ह्यात हॉटस्पॉट होऊ पाहत आहे.लग्नासाठी 50 लोकांची अट असल्याने लोक आता कार्यालयाऐवजी वाड्या, वस्त्यांवर हजारोंच्या संख्येत लग्न करीत आहेत. त्यासाठी गावोगावच्या समित्या कार्यरत कराव्यात.विवाह सोहळे,अंत्यविधी, दशक्रिया विधी व इतर कार्यक्रमांवर पोलीस व स्थानिक सरपंच, तलाठी, ग्रामसेवक,पोलीस पाटील यांनी समक्ष जाऊन चित्रीकरण करावे व नियम पाळले जात नसल्यास गुन्हे दाखल करा असे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी थेट श्रीरामपूर एसटी स्टँडवर

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात नियम पाळले जात नसल्याबाबत म ाहिती मिळाल्यानुसार त्यांनी थेट एसटी स्टँडवर जावून पहाणी केली. त्याठिकाणी गर्दी आढळून आल्याने त्यांनी डेपो व्यवस्थापक यांना बोलावून नियम पाळण्याचे आदेश दिले. बसमध्ये 50 टक्केच प्रवासी भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्टँडवर डिस्टन्सचे नियम पाळण्याचे आदेश दिले.

वैद्यकीय अधिकार्यांच्या कामाबाबत नाराजी

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात वैद्यकीय अधिकार्यांमध्ये समन्वय नाही. तसेच वैद्यकीय अधिकारी व महसूल प्रशासनात ताळमेळ दिसत नाही. त्यामुळे फक्त कागदोपत्री वाचन करुन माहिती देवू नका, प्रत्यक्ष कार्यवाही करा, असे सज्जड इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वैद्यकीय अधिकार्यांनी दिला.

श्रीरामपुरात दोन दुकानांना सील

जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या वतनीने श्रीरामपुरात मास्क न घालणार्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. शहरातील पोलिस स्टेशनजवळील ए 1 फ्रुट मर्चंटचे प्रो. प्रा. अब्दुल बागवान आणि बस स्टॅण्ड जवळील विवेक मोबाईल शॉपी सेल्स अॅण्ड सव्हिसचे प्रो.प्रा. महेंद्र जावळे हे दोघे विना मास्क व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याने ही दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत.