करोनाने अस्तगावला चौथा बळी

करोनाने अस्तगावला चौथा बळी
File Photo

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

अस्तगाव येथे करोनाने 15 दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आहे. शासनाचे संचारबंदीचे आदेश असताना

व गाव संपूर्ण लॉकडाऊन असले तरी रिकामटेकड्यांच्या घोळक्यातील गप्पा सुरुच आहेत. बंद दुकानांपुढे गप्पा मारणारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दिवसागणिक करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाकडे रुग्णांची कमी नोंद असली तर ही संख्या जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अस्तगावमध्ये दुसर्‍या टप्प्यातील या करोनाच्या महामारीने चौघांचा बळी घेतला आहे. करोनाचे गांभीर्य असतानाही नागरिक काळजी घेत नसल्याने रुग्णसंख्या वाढण्यास मदतच होत आहे.

दूध संकलन केंद्रांना व दूध उत्पादकांना सरकारने सकाळी तासभराची व सायंकाळी दोन तासांची वेळ दिली आहे. मात्र हे दूध उत्पादक सकाळी दूध घातल्यानंतर गप्पा मारत उभे राहतात. त्यांना आळा घातला पाहिजे. याशिवाय खाजगी अथवा सरकारी दवाखान्यांमध्ये येणार्‍या रुग्णांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कुणीही आग्रह करताना दिसत नाही. खासगी डॉक्टरांकडे गर्दी झाली तरी डॉक्टर त्या गर्दीकडे लक्ष देत नाहीत.

त्यांनाही सूचना देण्याची गरज आहे. मेडिकल दुकानांपुढे उभे राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची आखणी केलेली दिसत नाही. खासगी दवाखान्यात आल्यानंतर पेशंटला सॅनिटायझरही उपलब्ध करून दिले जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गोर्डे यांनी वेळोवेळी ग्रामस्थांना आवाहन करूनही यात फरक पडत नाही. ग्रामपंचायत प्रशासनही यावेळी शांत असल्याचे चित्र आहे.

गावात लॉकडाऊन सुुरू असतानाही काही ग्रामस्थ बाजारतळ, चाळीसवाडीची समोरील बाजू तसेच जगदंबा देवीच्या समोरील गावात जाणारा रस्त्याच्याकडेला तसेच सातमोर्‍याच्या दिशेने जाणार्‍या बाजार तळाजवळील रस्त्याच्या कडेनेही 7-8 जण बसलेले असतात. त्यांना कोण आवरणार! पुर्वी राहाता पोलीस पेट्रोलिंग करायचे आता तेही गावाला विसरले की काय? असा प्रश्न पडला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com