File photo
File photo
सार्वमत

करोनाची साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहर चार दिवस राहणार बंद

Arvind Arkhade

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने

करोनाची जी साखळी आहे. ती तोडण्यासाठी तसेच हॉटस्पॉट ठरलेल्या ज्या दहा भागांमधून करोना बाधित रुग्ण आढळून येत आहे.

त्या भागांमध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध पथक तयार करून सर्व्हे करण्यात येणार आहे. तो सर्व्हे व्यवस्थित रीत्या करण्यासाठी चार दिवस लागणार असल्याने २८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बँक पतसंस्था मेडिकल दवाखाने सुरु राहतील.

तसेच दुधाची उपलब्धता सकाळी ५ ते ८ यावेळेत सुरु असून इतर सर्व आस्थापने बंद राहणार असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com