देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरीवर करोनाबाधित करतात घरातच उपचार
करोनाबाधित

देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरीवर करोनाबाधित करतात घरातच उपचार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात करोनाचे रूग्ण वाढतच आहेत.

गेल्या तीन दिवसात देवळाली प्रवरात 23 तर राहुरी फॅक्टरी येथे 11 असे एकूण 34 करोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर अवघ्या 4 महिन्याच्या चिमुकल्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, देवळाली प्रवरा येथे दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शासकीय कोव्हिड सेंटरमध्ये शहरातीलच सुमारे 23 रूग्ण दाखल झाले. हे रूग्ण महागड्या उपचारामुळे घरीच राहून करोनावर उपचार घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या केंद्रात सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांवर मोफत उपचार केला जाणार असून अनेक रूग्ण गृहविलगीकरण कक्षात राहत असल्याने घरातील अन्य सदस्य बाधीत होऊन रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, अजूनही अनेक रूग्ण घरात थांबत असल्याचे चित्र देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात बघावयास मिळत आहे. देवळाली नगरपालिका प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com