करोना पॉझिटीव्ह रस्त्यावर; दोघांवर गुन्हा

करोना पॉझिटीव्ह रस्त्यावर; दोघांवर गुन्हा

कर्जत |वार्ताहर| Karjat

करोना पॉझिटीव्ह असताना शहरात फिरणार्‍या दोघांविरूद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई मनोज लातूरकर यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगरपरिषद मुख्याधिकारी गोविंद जाधव, सहायक निरीक्षक सुरेश माने, नगरपंचायतचे राकेश गदादे, विलास शिंदे, पोलीस कर्मचारी गाडे, बळीराम काकडे, नितीन नरोटे, मनोज लातूरकर असे कर्जत शहरात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणे व सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणार्‍या लोकांवर कारवाई करणे कामी गस्त घालत होते. दुपारी एकच्या सुमारास दोघे व्यक्ती या पथकाच्या निदर्शनास आले. ते पॉझिटीव्ह असल्याने त्यांना तात्काळ रुग्णवाहिका बोलावून कोव्हिड सेंटरला दाखल केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com