करोनामुक्तीचे प्रमाण 97 टक्क्यांच्या घरात

मंगळवारी 175 बाधितांची रुग्णसंख्येत भर
करोनामुक्तीचे प्रमाण 97 टक्क्यांच्या घरात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात दिवसंदिवस करोनामुक्तीची टक्केवारी वाढतांना दिसत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात

करोनातून बरे होणार्‍या रुग्णांची टक्केवारी 96.57 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 698 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान मंगळवारी नव्याने 175 करोना रुग्णांची वाढ झाली असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 149 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 15, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 25 आणि अँटीजेन चाचणीत 135 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, जामखेड 1, नगर ग्रामीण 3, पाथर्डी 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 8, अकोले 1, कोपरगाव 2, राहाता 1, राहुरी 4, संगमनेर 5, शेवगाव 1, श्रीरामपूर 2 आणि कॅन्टोन्मेंट 01 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 135 जण बाधित आढळुन आले.

यामध्ये अकोले 14, जामखेड 5, कर्जत 4, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 1, नेवासा 3, पारनेर 7, पाथर्डी 16, राहाता 27, राहुरी 8, संगमनेर 26, शेवगाव 8, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 9 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 41, अकोले 41, जामखेड 34, कर्जत 9, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 15, नेवासा 18, पारनेर 9, पाथर्डी 24, राहाता 18, राहुरी 13, संगमनेर 42, शेवगाव 15, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 1 आणि मिलिटरी हॉस्पिटल 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com