नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या ५१८ वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील रुग्ण संख्या ५१८ वर

५३ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या

Nilesh Jadhav

नेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa

नेवासा शहरासह तालुक्यात बुधवारी पुन्हा १२ नवीन रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका प्रशासनाने दिली. तालुक्यातील रुग्ण संख्या

५१८ वर गेली आहे. नेवासा येथील कोविड केअर सेंटर मध्ये ५३ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये सात व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून नेवासा शहर तीन, देवसडे, मुकींदपूर, भालगाव व खडका येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयातुन आलेल्या अहवालात ३ व्यक्ती करोना बाधीत आढळेल असून त्यामध्ये भानसहिवरा, नेवासा शहर व सोनई येथील प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे. तसेच खाजगी रुग्णालयातुन प्राप्त अहवालात शिंगवेतुकाई व मोरेगव्हान येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी दुपारपर्यंत तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ५१८ झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com