करोना अपडेट
करोना अपडेट
सार्वमत

जिल्ह्यात करोना बाधितांनी दोन हजारांचा टप्पा ओलांडला

24 तासांत 350 रुग्णांची भर : दोन मृत्यूसह उपचार घेत असलेल्यांची संख्या 854

Arvind Arkhade

अहमदनगर|Ahmednagar

जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने सोमवारी 2 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यातील बाधितांच्या रुग्ण संख्येत 350 नव्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना सुरूवात झाली असून गेल्या चार दिवसात झालेल्या 1 हजार 95 अँटीजेन चाचण्यामध्ये 158, खासागी प्रयोग शाळेतील 173 आणि जिल्हा रुग्णालयातील प्रयोग शाळेतून 10 करोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 हजार 27 झाली आहे.

दरम्यान, सोमवारी अचानक जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या पहिल्यांदा 854 वर पोहचली आहे. यासह जिल्ह्यात आणखी दोघांच्या मृत्यूची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण मृत्यूचा आकडा 40 झाला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये काल सकाळी 10 करोना बाधित रुग्ण आढळून आले तर खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि पोर्टलवर नोंद झालेल्या 173 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील निकट सहवासितांची जलदगतीने तपासणी करण्याच्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात अँटीजेन चाचण्यांना गेल्या 3-4 दिवसांपासून सुरुवात केली आहे.

आतापर्यंत 1095 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात 158 जण बाधित आढळले आहेत. त्याचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 854 इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या 2027 इतकी झाली आहे

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेचा वेग वाढावा यासाठी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणेला अँटीजेन किटचे वितरण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अशा चाचण्यांच्या माध्यमातून बाधित आढळलेल्या 158 रुग्णांची आज भर पडली.

जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला या अँटीजेन कीटचे वितरण करण्यात आले आहे. गेल्या तीन-चार दिवसांत केलेल्या चाच्ण्याचा एकत्रित अहवाल काल जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे आला. त्यात बाधित आढळलेल्या रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.

याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या रुग्णांची नोंद ही एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे. जिल्ह्यात आता 2 हजार 27 करोना रुग्ण असून त्यातील 854 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.

अँटीजेन चाचण्यांचा अहवाल

श्रीरामपूर 9, नेवासा 8, पाथर्डी 67, कोपरगाव 3, संगमनेर 50 भिंगार कॅन्टोन्मेंट 18 आणि मनपा 3 अशा 158 पॉझिटिव्हचा समावेश आहे.

सरकारी प्रयोग शाळेतील बाधित

नेवासा 4 (सलाबतपूर4), कर्जत 1 (शहर), शेवगाव 1 (वडगाव), नगर शहर 2, संगमनेर 1 (घुलेवाडी) आणि नगर ग्रामीण 1 (रुईछ्त्तीसी) अशा रुग्णांचा समावेश आहे.

सारांश

उपचार सुरू असलेले रुग्ण 854

बरे झालेले रुग्ण 1133

मृत्यू 40

एकूण रुग्ण संख्या 2 हजार 27

सोमवारी सकाळी आणखी 111 रुग्णांनी करोनावर मात केली. यात नगर ग्रामीण 1, नगर शहर 37, नेवासा 5, पारनेर 3, राहाता 4, पाथर्डी 14,भिंगार कॅन्टोन्मेंट 2, राहुरी 4, संगमनेर 32, श्रीगोंदा 1, अकोले 7, कर्जत येथील 1 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 1 हजार 136 झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com