Good News : जिल्ह्यात आज विक्रमी रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

Good News : जिल्ह्यात आज विक्रमी रुग्णांची करोनावर मात

नगर शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील तब्बल ४६५ करोना बाधित बरे होऊन घरी परतले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर मनपा २७९, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी ०४, नगर ग्रामिण १५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा १५, श्रीगोंदा १७, पारनेर १२, अकोले ६, राहुरी११, शेवगाव ८, कोपरगाव ३, जामखेड १, कर्जत ५ रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत १९४५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com