करोना
करोना
सार्वमत

29 सरकारी, खासगी 14 अहवाल पॉझिटिव्ह

करोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी अचानक मुसंडी मारली

Arvind Arkhade

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी अचानक मुसंडीच मारली. दिवसभरात जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोग शाळेतून 29 व्यक्तींचे करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याशिवाय, पीएमटी लोणी आणि पुण्यातील खाजगी प्रयोगशाळा याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 14 रुग्णांची नोंद जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 465 वर पोहचला असून ऑक्टिव्ह रुग्णांची संख्या 144 वर पोहचला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोग शाळेत दोन टप्प्यात आलेल्या अहवालात नगर शहर 12, संगमनेर 3, भिंगार 5, श्रीरामपूर 2, पारनेर 2, जामखेड 2, शेवगाव 1, श्रीगोंदा 1 आणि राजुरी (पुणे) 1 यांचा समावेश आहे. याशिवाय पीएमटी लोणी आणि पुण्यातील खाजगी प्रयोगशाळा याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यामध्ये दाढ (ता. राहाता) 7, संगमनेर 1, कोल्हार 3, मजले चिंचोली (ता.नगर) 1 आणि सारसनगर (नगर शहर) 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. सारसनगर आणि मजले चिंचोली येथील रुग्ण पुणे येथे उपचार घेत आहेत, तर दाढ आणि कोल्हार येथील रुग्ण पीएमटी लोणी येथे उपचार घेत आहेत.

काल दुपारी आलेल्या अहवालात संगमनेर तालुक्यातील कुरण येथे 3 व्यक्ती बाधित आढळून आल्या. नगर शहरातील झारेकर गल्ली येथील 32 वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील 32 वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील 30 वर्षीय पुरुष आणि 28 वर्षीय महिला, तोफखाना येथील 6 वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील 38 वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील 40 वर्षीय महिला बाधित आढळून आली. भिंगार येथील 35 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय आणि 38 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील 30 वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. श्रीरामपूर येथील 48 वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील 62 वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील32 वर्षीय व्यक्ती (कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील 30 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

सायंकाळी दुसर्‍या टप्प्यात आलेल्या अहवालात आणखी 10 कोरोना बाधित आढळून आले. यात जामखेड येथील 42 वर्षीय पुरुष आणि परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला 28 वर्षीय पुरुष यांचा समावेश होता. राजुरी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथील 36 वर्षीय पुरुष यासह नगर शहरातील बालिकाश्रम रोड बागवान मळा येथील एकाच कुटुंबातील 9 वर्षीय मुलगा आणि 12 वर्षीय मुलगी बाधित आढळून आले. नगर शहरातील चितळे रोड येथील 36 वर्षीय पुरुष आणि श्रीरामपूर येथील 70 वर्षीय महिला बाधित सापडले. नगर शहरातील ढवण वस्ती येथील 28 वर्षीय पुरुष आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील 55 वर्षीय महिला यास नगर शहरातील एकवीरा चौक पद्मा नगर येथील 75 वर्षीय महिला बाधित आढळून आली. जिल्ह्यात करोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 307 असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 465 झाली आहे. जिल्ह्यात सध्या 144 अ‍ॅक्टिव रुग्ण असून मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 14 आहे.

आणखी 16 करोनामुक्त
80 वर्षांचे वृध्द आणि 2 वर्षांच्या चिमुकलीसह जिल्ह्यात मंगळवारी 16 रुग्णांनी करोनावर मात केली. यात नगर शहर 13 आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी 55 व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते.
Deshdoot
www.deshdoot.com