करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळण्यापूर्वी बिलांची तपासणी

शहरातील 42 खाजगी रुग्णालयात ऑडिटरची नियुक्ती
करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळण्यापूर्वी बिलांची तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील खाजगी रुग्णालयात करोना उपचार घेणार्‍या रुग्णांना डिस्चार्ज मिळण्याच्या आधीच बिलांची तपासणी केली जाणार आहे.

यासाठी शहरातील 42 रुग्णालयांत महापालिकेचे ऑडिटर (लेखापरीक्षक) पथक नियुक्त केले असल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली. खाजगी रुग्णालयांकडून करोना रुग्णांवर उपचार करताना वाढीव बिले आकारली जात असल्याचा आरोप होत होता. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव नितीन भुतारे यांनी आवाज उठविला होता.

करोना रुग्णांवर उपचार करणार्‍या शहरातील खाजगी रुग्णालयांनी रुग्णांचे बिल हे महानगरपालिकेने नेमणूक केलेल्या ऑडिटरकडे रुग्णाला डिस्चार्ज देण्याअगोदर जमा करणे बंधनकारक असणार आहे. शासकीय नियमानुसार तपासणीअंती रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना हे बील भरावे लागणार आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एका बाजूला खाजगी रुग्णालयामधील वाढीव बिलांची लूटमार थांबणार आहे. बिलांची तपासणी करणार्‍या ऑडिटरची माहिती सर्व खाजगी रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com