रूग्णांना एक, तर ऑडिटरसाठी दुसरे बिल ?

नगरच्या खाजगी रूग्णालयातील प्रकार; चौकशीची मागणी
रूग्णांना एक, तर ऑडिटरसाठी दुसरे बिल ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरमधील काही रुग्णालयामध्ये करोनाबाधित रुग्णांचे बिल शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे व रुग्णालयाने आपल्या मर्जीप्रमाणे आकारत असलेल्या दराप्रमाणे, अशी दोन प्रकारची बिले केली जातात. मात्र, लेखापरीक्षकाकडे पाठविताना शासनाने निश्चित केलेल्या दराचे बिल पाठविण्यात येत असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केला आहे.

नगरच्या खासगी रुग्णालयाकडून करोना रुग्णाकडून शासकीय प्रमाणे शुल्क घेण्यात येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर व रुग्णांची फसवणूक करणारी आहे. त्यामुळे या प्रकाराची स्वतंत्र पथक नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, काही रुग्णालयांनी आकारलेल्या शुल्काबाबत कोणतीही तक्रार करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे. राज्य शासनाने रुग्णालयांना करोना रुग्णांसह इतर आजारांसाठी शुल्क निश्चित केले आहे. मात्र, नगर महापालिका हद्दीतील बहुसंख्य कोविड सेंटर व खासगी रुग्णालयांकडून त्याप्रमाणे शुल्क आकारणी केली जात नाही. यातून रुग्णांची मोठी लूट सुरू असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com