COVID19 : तेलकुडगावमध्ये सापडले 'इतके' रुग्ण

COVID19 : तेलकुडगावमध्ये सापडले 'इतके' रुग्ण

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

तालुक्यातील तेलकुडगाव ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्र (Telkudgaon Gram Panchayat Health Sub Center) वतीने शनिवार दि.3 रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्टचा (Rapid antigen test) कॅम्पमध्ये एकूण ५० व्यक्तींची चाचणी करण्यात आली त्यापैकी चार व्यक्ती करोना बाधित (Corona Positive) असल्याचे आढळून आले.

तेलकुडगाव येथे करोना संसर्गजन्य आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने संसर्गजन्य आजारांची साखळी तुटावी म्हणून शनिवार ते रविवार या नऊ दिवसाचा "जनता कर्फ्यू" (Janata Curfew) जाहीर केला आहे. नागरिकांना शासकीय नियमांचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले. खबरदारी म्हणून रॅपिड अँटीजन टेस्टचा कॅम्प (Rapid antigen test) घेण्यात आला. त्यात ५० व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यापैकी चार पेशंट कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यांना लगेच भेंडे येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.करोनाचे लक्षणे (Symptoms of corona) असणाऱ्या व बाधित रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तींनी व संपर्कात आलेल्या व्यक्तींनी ही तपासणी करून घेतली.

रॅपिड अँन्टीजन टेस्ट कॅम्प Rapid antigen test) पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे, ज्ञानेश्वर काळे, बालकनाथ काळे, साईनाथ काळे, रुपचंद गटकळ, पत्रकार गणेश घाडगे, पोलीस पाटील शिवाजी घोडेचोर, सतीशराव काळे, ग्रामसेवक, सर्व स्टाफ, समाजसेवक छानदेव घोडेचोर, आरोग्य उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खवल, आरोग्य सेवक चिलगर, आरोग्य सेविका श्रीमती कांबळे, आशा सेविका शोभा इंगोले, सविता घोडेचोर, शुभांगी घाडगे, संगिता साळवे आदींनी सहकार्य केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com