Coronavirus : जिल्ह्यात आज एक हजार ८५१ नवे रुग्ण

112 लहान मुलांना करोनाची लागण
Coronavirus : जिल्ह्यात आज एक हजार ८५१ नवे रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोना रुग्णांची आकडेवारी खाली येताना दिसत आहे. रविवारी पुन्हा नव्या करोना बाधितांचा आकडा दोन हजारांच्या आत आला असला तरी मृतांच्या आकडेवारी 83 ची भर पडली आहे. यासह काल बाधित आलेल्यांमध्ये दहा वर्षांच्या आतील मुलांची संख्या 112 असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात काल 2 हजार 799 करोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यातुळे करोनातून मुक्त होणार्‍यांची संख्या आता 2 लाख 30 हजार 403 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 92.71 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल नव्याने 1 हजार 851 करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 15 हजार 284 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 370, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 493 आणि अँटीजेन चाचणीत 988 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 3, अकोले 76, जामखेड 5, कर्जत 25, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 49, नेवासा 11, पारनेर 4, पाथर्डी 48, राहाता 12, राहुरी 3, संगमनेर 62, श्रीगोंदा 19, श्रीरामपूर 6, कँटोन्मेंट 6, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 92, अकोले 22, जामखेड 1, कर्जत 1, कोपरगाव 16, नगर ग्रामीण 56, नेवासा 37, पारनेर 32, पाथर्डी 14, राहाता 42, राहुरी 49, संगमनेर 60, शेवगाव 5, श्रीगोंदा 16, श्रीरामपूर 37, कँटोन्मेंट बोर्ड 04 आणि इतर जिल्हा 9 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 988 जण बाधित आढळुन आले. मनपा 31, अकोले 57, जामखेड 29, कर्जत 59, कोपरगाव 82, नगर ग्रामीण 68, नेवासा 63, पारनेर 145, पाथर्डी 65, राहाता 37, राहुरी 59, संगमनेर 98, शेवगाव 38, श्रीगोंदा 107, श्रीरामपूर 47, कँटोन्मेंट 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 746 होती. त्यात 83 ची भर पडल्याने करोना बळींची संख्या आता 2 हजार 829 झाली आहे.

संगमनेर 220, पारनेर 181, नगर ग्रामीण 173, अकोले 155, श्रीगाेंंदा 142, मनपा 132, पाथर्डी 127, कोपरगाव 122, नेवासा 111, राहुरी 111, राहाता 91, श्रीरामपूर 90, कर्जत 85, शेवगाव 43, जामखेड 35, अन्य जिल्हा 21, भिंगार 11 आणि लष्कर रुग्णालय 1.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com