COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार १६१ रुग्णांची नोंद

कुठे, किती रुग्ण?
COVID19 : जिल्ह्यात आज दोन हजार १६१ रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात मंगळवारी नव्याने 2 हजार 161 नवे करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 28 करोना बाधितांची एकूण रुग्ण संख्येत भर पडली आहे. जिल्ह्यात काल 3 हजार 156 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्तांची संख्या 2 लाख 14 हजार 346 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 90.86 टक्के झाले असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 19 हजार 39 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 268, खाजगी प्रयोग शाळेत केलेल्या तपासणीत 694 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 199 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 25, जामखेड 2, कर्जत 31, कोपरगाव 73, नगर ग्रामीण 41, नेवासा 1, पारनेर 2, पाथर्डी 1, राहता 4, राहुरी 50, संगमनेर 1, शेवगाव 1, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 2 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 76, अकोले 15, जामखेड 71, कर्जत 10, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 32, नेवासा 125, पारनेर 25, पाथर्डी 58, राहाता 30, राहुरी 5, संगमनेर 54, शेवगाव 66, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 77, कँटोन्मेंट बोर्ड 3 आणि इतर जिल्हा 31 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 1 हजार 199 जण बाधित आढळुन आले.

मनपा 30, अकोले 95, जामखेड 12, कर्जत 93, कोपरगाव 52, नगर ग्रामीण 58, नेवासा 170, पारनेर 137, पाथर्डी 121, राहाता 64, राहुरी 106, संगमनेर 59, शेवगाव 46, श्रीगोंदा 81, श्रीरामपूर 64 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी जिल्ह्यात करोनात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 हजार 488 होती. यात काल 28 ने वाढ झाल्याने करोना बळींची संख्या आता 2 हजार 516 झाली आहे.

नेवासा 296, पाथर्डी 180, पारनेर 164, राहुरी 161, श्रीरामपूर 143, कर्जत 134, मनपा 131, नगर ग्रामीण 131, कोपरगाव 129, श्रीगोंदा 123, संगमनेर 114, शेवगाव 113, अकोले 110, राहाता 98, जामखेड 85, अन्य जिल्हा 46, भिंगार 3, लष्कर रुग्ण शुन्य.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com