नगरकरांनो वेळीच सावरा..! जिल्ह्यात पुन्हा एकदा वाढतेय करोना रुग्णांची संख्या

कुठे, किती रुग्ण?
नगरकरांनो वेळीच सावरा..! जिल्ह्यात पुन्हा एकदा वाढतेय करोना रुग्णांची संख्या

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात मंगळवारी 469 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 76 हजार 999 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.90 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 635 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 866 इतकी झाली आहे. यात पारनेर तालुका टॉपवर आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 45, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 222 आणि अँटीजेन चाचणीत 368 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 10, अकोले 1, जामखेड 1, नगर ग्रामीण 6, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 13, राहुरी 4, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 1 आणि कँटोन्मेंट बोर्ड 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 3, अकोले 1, जामखेड 23, कर्जत 30, कोपरगाव 25, नगर ग्रामीण 11, नेवासा 21, पारनेर 2, पाथर्डी 4, राहता 1, राहुरी 19, संगमनेर 16, शेवगाव 40, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 14 आणि इतर जिल्हा09 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 368 जण बाधित आढळुन आले. मनपा 8, अकोले 24, जामखेड 10, कर्जत 53, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 14, नेवासा 10, पारनेर 133, पाथर्डी 43, राहता 14, राहुरी 2, संगमनेर 5, शेवगाव 9, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 23, अकोले 13, जामखेड 22, कर्जत 31, कोपरगाव 19, नगर ग्रा. 26, नेवासा 24, पारनेर 48, पाथर्डी 40, राहता 30, राहुरी 38, संगमनेर 49, शेवगाव 21, श्रीगोंदा 66, श्रीरामपूर 12 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

...................

मृतांचा आकडा 6 हजारांजवळ

जिल्ह्यात करोना पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत करोनामुळे मृत पावलेल्यांंची आता 5 हजार 998 झाली आहे. मार्च महिन्यांत हा आकडा 3 हजारांच्या आसपास होता. करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे हे प्रमाण दुप्पट झालेले आहे.

.....................

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com