थोडासा दिलासा! जिल्ह्यात करोनाची दैनंदिन रुग्ण संख्येत घट

थोडासा दिलासा! जिल्ह्यात करोनाची दैनंदिन रुग्ण संख्येत घट

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात शनिवारी करोना रुग्णसंख्या दोन हजारांच्या आत आली. 1 हजार 856 रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले. जिल्ह्यात 16 हजार 315 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी संगमनेर, अकोले आणि राहुरी तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली. दरम्यान, सरकारी पोर्टलवरील आकडेवारीनुसार 24 तासांमध्ये जिल्ह्यात 96 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 3 हजार 48 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 27 हजार 604 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या चाचणीत 140, खाजगी प्रयोगशाळेतील चाचणीत 869 आणि अँटीजेन चाचणीत 847 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयानुसार मनपा 1, अकोले 1, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 7, नेवासा 22, पारनेर 12, पाथर्डी 7, राहता 4, राहुरी 10, संगमनेर 5, शेवगाव 1, श्रीगोंदा 25, श्रीरामपूर 42 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेनुसार मनपा 84, अकोले 159, जामखेड 3, कर्जत 8, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 46, नेवासा 20, पारनेर 31, पाथर्डी 16, राहाता 46, राहुरी 95, संगमनेर 251, शेवगाव 9, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 59, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीनुसार मनपा 41, अकोले 44, जामखेड 25, कर्जत 83, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 42, नेवासा 50, पारनेर 73, पाथर्डी 93, राहाता 36, राहुरी 80, संगमनेर 98, शेवगाव 37, श्रीगोंदा 40, श्रीरामपूर 47 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तालुकानिहाय रुग्ण संख्या

संगमनेर 354, अकोले 204, राहुरी 185, श्रीरामपूर 148, नगर शहर 126, पारनेर 116, पाथर्डी 116, नगर ग्रामीण 95, नेवासा 92, कर्जत 91, राहाता 86, श्रीगोंदा 76, कोपरगाव 69, शेवगाव 47, जामखेड 28, भिंगार 1, इतर जिल्हा 22

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com