COVID19 : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मात्र धोका कायम

COVID19 : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मात्र धोका कायम
Corona

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. यामुळे मागील आठवड्यात 4 हजारांपेक्षा अधिक येणार्‍या बाधितांचा आकडा आता 2 हजारांच्या टप्प्यात आला आहे. यासह करोनातून मुक्त होणार्‍यांची टक्केवारी 90 टक्क्यांच्या पुढे सरकली असून उपचार सुरू असणार्‍यांची संख्या 20 हजारांपर्यंत खाली आली आहे.

जिल्ह्यात काल 4 हजार 52 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोना मुक्तांची संख्या आता 2 लाख 11 हजार 190 इतकी झाली आहे. काल नव्याने 2 हजार 105 नवे करोना रुग्ण आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 380, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 863 आणि अँटीजेन चाचणीत 862 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 10, अकोले 113, कर्जत 2, कोपरगाव 40, नगर ग्रामीण 1, नेवासा 98, पारनेर 2, पाथर्डी 3, राहाता 2, राहुरी 5, संगमनेर 60, श्रीरामपूर 22, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1, मिलिटरी हॉस्पिटल 19 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 112, अकोले 21, जामखेड 34, कर्जत 13, कोपरगाव 16, नेवासा 69, पारनेर 106, पाथर्डी 54, राहाता 80, राहुरी 40, संगमनेर 23, शेवगाव 135, श्रीगोंदा 69, श्रीरामपूर 26, कॅन्टोन्मेंट बोर्ड 40, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि इतर जिल्हा 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 862 जण बाधित आढळून आले. मनपा 7, अकोले 71, जामखेड 18, कर्जत 53, कोपरगाव 118, नेवासा 35, पारनेर 67, पाथर्डी 72, राहाता 131, राहुरी 55, संगमनेर 70, शेवगाव 16, श्रीगोंदा 55, श्रीरामपूर 30, कँटोन्मेंट 53 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.

असे आहेत बाधित

पाथर्डी 213, अकोले 205, नगर ग्रामीण 202, नेवासा 175, कोपरगाव 174, राहुरी 153, संगमनेर 151, नगर मनपा 129, पारनेर 129, शेवगाव 124, राहाता 100, श्रीरामपूर 94, श्रीगोंदा 78, कर्जत 68, जामखेड 52, अन्य जिल्हा 33, भिंगार 24, लष्कर रुग्णालय 1 अन्य राज्य शून्य.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com