नगरकरांनो काळजी घ्या..! जिल्ह्यात पुन्हा वाढतेय करोना रुग्णांची संख्या

नगरकरांनो काळजी घ्या..! जिल्ह्यात पुन्हा वाढतेय करोना रुग्णांची संख्या

आज किती नवे रुग्ण?; कुठे, किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे.

आज जिल्ह्यात ८३३ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १५६ , खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८३ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २९४ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - २२७

श्रीगोंदा - ११३

पारनेर - ९४

अकोले - ५०

राहाता - ४९

नगर ग्रामीण - ४५

शेवगाव - ४०

राहुरी - ३३

कर्जत - २९

पाथर्डी - २९

नेवासा - २८

इतर जिल्हा - २४

कोपरगाव - २२

श्रीरामपूर - २१

मनपा - १५

जामखेड - ११

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०२

मिलिटरी हॉस्पिटल - ०१

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com