करोनावर मात करण्यासाठी आमदार निधी, परिपत्रक जारी

करोनावर मात करण्यासाठी आमदार निधी, परिपत्रक जारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निधीतून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक नियोजन विभागाने जारी केले आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ‘वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य तसेच औषधे व साधनसामुग्री’ खरेदीकरिता विधानमंडळ सदस्यांनी निधीची शिफारस केल्यास जिल्हाधिकार्‍यांनी ‘प्रशासकीय मान्यता’द्यावी. त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यात्वयीन यंत्रणांचे प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक, झेडपीचे जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा आवश्यकतेनुसार मनपा आयुक्त, पालिकांचे मुख्याधिकारी यांना अटींवर ही साधनसामुग्री खरेदी करता येईल. ही साधनसामुग्री निश्चित केलेल्या धोरणानुसार खरेदी करता येणार आहे.

ही साधनसामुग्री खरेदी करता येणार

ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर्स, हॉस्पिटल बेडस्, तसेच आयुसीयु बेडस्, व्हायटल साइरन मॉनिटर्स, एनआयसीयु व्हेंटीलेटर्स, बायपँप मशिन्स, स्ट्रेचर, पेशंट ट्रॉलीज, इमरजन्सी ट्रॉलीज, फार्मासीटीकल फ्रिजेस, व्हॅक्सीन बॉक्सेस, करोना विषाणू प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधनसामुग्री.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com