Coronavirus : जिल्ह्यात घटलेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली

Coronavirus : जिल्ह्यात घटलेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संख्येने पुन्हा तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यासह करोना मृतांच्या आकडेवारीत 26 ची वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत घटलेल्या करोना रुग्ण संख्येमुळे उपचार सुरू असणार्‍यांचा आकडा 22 हजार 929 पर्यंत खाली आहे. तर दुसरीकडे नगर शहरातील करोनाची संख्या कमी झाली असली तरी संगमनेर, अकोले आणि राहुरी तालुक्यातील रुग्णांची वाढ झालेली आहे.

दरम्यान आतापर्यंत प्रयोग शाळेत तपासण्यात आलेल्या 8 लाख 38 हजार 859 स्त्राव नमुन्यांपैकी 2 लाख 25 हजार 609 नमुने पॉझिटिव्ह आलेले असून त्याची टक्केवारी 26.89 टक्के असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी 4 हजार 568 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 250 इतकी झाली आहे. शुक्रवारी नव्याने 3 हजार 494 करोना वाढलेले असताना उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 22 हजार 929 झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 331, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2 हजार 03 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 160 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर 1, अकोले 1, राहुरी 42, नगर ग्रामीण 19, श्रीरामपूर 119, मनपा 18, पारनेर 1, राहाता 84, श्रीगाेंंदा 2, नेवासा 2, पाथर्डी 2, शेवगाव 2, कोपरगाव 22, कर्जत 2, जामखेड 2, अन्य जिल्हा 2, भिंगार 8, लष्कर रुग्णालय 2 असे आहेत. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर 433, अकोले 352, राहुरी 126, नगर ग्रामीण 218, श्रीरामपूर 71, मनपा 182, पारनेर 58, राहाता 85, श्रीगोंदा 36, नेवासा 150, पाथर्डी 76, शेवागव 112, कोपरगाव 33, कर्जत 20 जामखेड 25, अन्य जिल्हा 18, भिंगार 5, अन्य राज्य 3 या रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत संगमनेर 15, अकोले 35, राहुरी 136, नगर ग्रामीण 48, श्रीरामपूर 74, मनपा 41, पारनेर 174, राहाता 62, श्रीगोंदा 173, नेवासा 46, पाथर्डी 80, शेवगाव 43, कोपरगाव 97, कर्जत 82, जामखेड 45, अन्य जिल्हा 6, भिंगार 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. यासह करोना 26 करोना बळींची एकूण रुग्ण संख्येत वाढ झाली असून यातील 9 मृत्यू हे गेल्या 48 तासातील असून उर्वरित 16 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. करोना पोर्टलवर त्यांची नोंद झाल्याने करोना मृतांच्या आकडेवारीत त्यांची भर पडलेली आहे.

असे आहेत करोना रुग्ण

संगमनेर 449, अकोले 388, राहुरी 304, नगर ग्रामीण 285, श्रीरामपूर 264, मनपा 241, पारनेर 233, राहाता 231, श्रीगोंदा 211, नेवासा 198, पाथर्डी 158, शेवगाव 157, कोपरगाव 152, कर्जत 104, जामखेड 72, अन्य जिल्हा 26, भिंगार 16, अन्य राज्य 3 आणि लष्कर रुग्णालय 2 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com