COVID19 : जिल्ह्यात घटलेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली

COVID19 : जिल्ह्यात घटलेली दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वाढली

अहमदनगर | Ahmednagar

नगर शहरातील करोना संसर्ग कमी करण्यात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला यश आले असले तरी ग्रामीण भागातील करोनाचे संक्रमण थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. बुधवारी नव्याने संगमनेर, नेवासा आणि पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण समोर आले आहेत. तर जवळपास आठवडाभरानंतर जिल्ह्यात पुन्हा पावणे चार हजार नवे करोना रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात काल 2 हजार 684 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 17 हजार 30 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 90.55 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल नव्याने 3 हजार 779 करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 20 हजार 107 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 449, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 968 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 362 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 33, कर्जत 78, कोपरगाव 27, नगर ग्रामीण 102, नेवासा 13, पारनेर 4, पाथर्डी 1, राहाता 3, राहुरी 57, संगमनेर 1, शेवगाव 5, श्रीगोंदा 104, कँटोन्मेंट 5, मिलिटरी हॉस्पिटल 5 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 146, अकोले 185, जामखेड 62, कर्जत 8, कोपरगाव 60, नगर ग्रामीण 131, नेवासा 216, पारनेर 206, पाथर्डी 100, राहाता 178, राहुरी 35, संगमनेर 306, शेवगाव 153, श्रीगोंदा 30, श्रीरामपूर 104, कँटोन्मेंट बोर्ड 7 आणि इतर जिल्हा 40 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत काल 1 हजार 362 जण बाधित आढळून आले. मनपा 11, अकोले 65, जामखेड 48, कर्जत 85, कोपरगाव 54, नगर ग्रामीण 31, नेवासा 173, पारनेर 107, पाथर्डी 91, राहाता 83, राहुरी 79, संगमनेर 310, शेवगाव 76, श्रीगोंदा 75, श्रीरामपूर 64 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

संगमनेर 617, नेवासा 402, पारेनर 317, नगर ग्रामीण 264, राहाता 264, अकोले 250, शेवगाव 234, श्रीगोंदा 209, पाथर्डी 192, नगर मनपा 190, कर्जत 171, राहुरी 171, श्रीरामपूर 168, कोपरगाव 140, जामखेड 110, अन्य जिल्हा 61, भिंगार 12, लष्कर रुग्णालय, 5 अन्य राज्य 1 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com