करोना बळावतोय! जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद; संगमनेर, पाथर्डी टॉपला

करोना बळावतोय! जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद; संगमनेर, पाथर्डी टॉपला

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन, अन्य दिवशी दुपारी चारनंतर बंधने असतांना ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत करोनाने हातपाय पसरविण्यास सुरूवात केली आहे. यामुळे उपचार घेणार्‍यांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात पोहचली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास जिल्ह्याची वाटचाल करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या दिशेन जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात रविवारी 452 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे होणार्‍यांची संख्या 2 लाख 79 हजार 304 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.71 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 758 ने वाढ वाढली आहे. यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 119 रुग्ण सापडले असून दुसर्‍या स्थानावर पाथर्डी 86 तर पारनेर तालुक्यात 78 आणि कर्जत तालुक्यात 77 नवे रुग्ण सापडलेले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 18, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 338 आणि अँटीजेन चाचणीत 402 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 1, जामखेड 3, नगर ग्रामीण 2, पारनेर 1, पाथर्डी 7 आणि श्रीगोंदा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 38, अकोले 14, जामखेड 4, कर्जत 23, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 15, नेवासा 13, पारनेर 17, पाथर्डी 6, राहता 11, राहुरी 8, संगमनेर 97, शेवगाव 31, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 26 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तर अँटीजेन चाचणीत 402 जण बाधित आढळुन आले. मनपा 7, अकोले 32, जामखेड 18, कर्जत 54, कोपरगाव 22, नगर ग्रामीण 8, नेवासा 30, पारनेर 60, पाथर्डी 73, राहता 14, राहुरी 10, संगमनेर 22, शेवगाव 23, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 8 आणि कँटोन्मेंट बोर्ड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 14, अकोले 22, जामखेड 29, कर्जत 43, कोपरगाव 12, नगर ग्रा. 24, नेवासा 48, पारनेर 71, पाथर्डी 36, राहता 16, राहुरी 16, संगमनेर 47, शेवगाव 24, श्रीगोंदा 35, श्रीरामपूर 11, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com