नेवासा तालुक्यातील पाचेगावमध्ये करोनाचा शिरकाव

नेवासा तालुक्यातील पाचेगावमध्ये करोनाचा शिरकाव

बाजारतळ परिसरात रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये खळबळ

पाचेगाव | वार्ताहर | Pachegaon

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे करोनाने शिरकाव केला असून एका संशयित व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची प्राथमिक माहिती नेवासा बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सोमनाथ यादव यांनी दिली आहे.

 गेल्या मंगळवारी संशयित रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी या रुग्णाचा पॉझिटिव्ह आला आहे.या बाधित रुग्णाने पाचेगावातील एका खाजगी रुग्णालयात  उपचार घेतल्याने नागरिकांमध्ये आणखी चिंता वाढली आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांनी स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींची काळाजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Last updated

Deshdoot
www.deshdoot.com