कर्जतच्या पोलीस व आरोग्य विभागामध्ये करोनाचा शिरकाव
सार्वमत

कर्जतच्या पोलीस व आरोग्य विभागामध्ये करोनाचा शिरकाव

Nilesh Jadhav

कर्जत |वार्ताहर| Karjat

करोना या जीवघेण्या महामारीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी अहोरात्र काम करणारे आरोग्य विभागातील कर्मचारी व पोलीस विभाग यांच्यामध्येच करोनाने शिरकाव केला आहे. कर्जत मधील एका पोलीस कर्मचार्‍यास तसेच आरोग्य विभागातील एका कर्मचार्‍यास याची बाधा झाली आहे. या दोघांना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि ते पॉझिटिव्ह आले आहेत.

करोनाचा विळखा कर्जत तालुक्यामध्ये हळूहळू चांगलाच पसरू लागला आहे. त्यामध्ये आजपर्यंत 184 जणांना या जीवघेण्या आजाराची बाधा झाली आहे. यामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा शिरकाव झाल्याचे दिसून येते तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तब्बल 161 रुग्ण आढळले आहेत तर कर्जत शहरामध्ये आत्तापर्यंत अवघे 23 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये देखील अनेक रुग्ण हे बाहेरगावी राहणारे असून उपनगरांमध्ये ते काही काळाकरिता राहत आहेत. आत्तापर्यंत 84 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत आणि सध्या 100 जणांवर उपचार सुरू आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 173 ठिकाणचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून प्रशासनाने सील केलेला आहे. जनतेची काळजी घेणार्‍या पोलीस व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना या आजाराची बाधा झाल्यामुळे सणांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांचे संरक्षण करताना या दोन्ही विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना या पुढील काळात आणखी काळजी घेण्याची गरज आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com