जैनपूरमध्ये आढळला करोना बाधित
सार्वमत

जैनपूरमध्ये आढळला करोना बाधित

बेलपिंपळगाव'करांची चिंता वाढली

Nilesh Jadhav

बेलपिंपळगाव | वार्ताहर | Belpimpalgaon

नेवासा तालुक्यातील जैनपूर येथे एक व्यक्ती करोना बाधीत आढळून आली आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्क व घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आढळलेला बाधीत जैनपूरचा आहे पण चिंता बेलपिंपळगावची वाढली आहे. कारण जैनपूरचा सगळा व्यवहार हा बेलपिंपळगाव येथून सुरू असतो. त्या गावातील अनेक नागरिकांची वर्दळ बेलपिंपळगावला बँक, सोसायटी तसेच अन्य कामासाठी असते. तसेच बाधीत आढळून आलेला रुग्ण गेल्या दोन ते तीन दिवसापासून बेलपिंपळगाव येथे एका डॉक्टरसह अनेकांच्या संपर्कत आला असल्याने दोनही गावांची चिंता वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com