पाच तालुके करोनाचे हॉटस्पॉट

जिल्हाधिकारी डॉ. भोसले : 50 ची मर्यादा ओलांडणार्‍या मंगल कार्यालय महामारी संपेपर्यंत बंद करण्याचे आदेश
पाच तालुके करोनाचे हॉटस्पॉट
नवीन नाशिक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात संगमनेर (Sangmner), पारनेर (Parner), पाथर्डी (Pathardi), शेवगाव (Shevgav) आणि श्रीगोंदा (Shrigonda) हे करोनाचे हॉटस्पॉट (Corona Hotspot) ठरले आहेत. या ठिकाणी करोना संसर्ग (Corona contagion) रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष करून लग्न समारंभासाठी (Wedding ceremony) 50 व्यक्तिंची मर्यादा असतांना त्याठिकाणी गर्दी (Crowd) करणार्‍यांवर कारवाईसोबत संबंधीत मंगल कार्यालय हे महामारी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी प्रातांधिकारी आणि तहसीदार यांना दिले आहेत.

जिल्ह्यात पाच तालुके करोनाचे हॉटस्पॉट ठरले असून त्याठिकाणी उपाययोजना (Measures) करण्यासोबतच प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने तालुका आणि गावपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा प्रकारे कऱण्यात येत आहेत, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर (Zilla Parishad CEO Dr. Rajendra Kshirsagar) आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) हे थेट संबंधीत तालुक्याला भेट देवून करोना प्रतिबंधासाठी प्रयत्न करत आहेत. गुरूवारी या तिघांनी संगमनेर (Sangmner) आणि पारनेर (Parner) तालुक्यात भेट देवून करोना संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, करोना संससर्ग वाढत असल्याने सर्व व्यवहार बंद करणे अपेक्षित आहे. आता जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांच्यामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पायमल्ली कऱणार्‍यांवर कडक कार्यवाही केली जात आहे. केवळ दंड नव्हे तर आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आस्थापना करोना प्रादुर्भाव संपेपर्यंत बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

याशिवाय, लग्न समारंभ, इतर समारंभात सहभागी होऊन परवानगी पेक्षा जास्त गर्दी जमवणारे आयोजक आणि संबंधित ठिकाणच्या जागा मालकांवरही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संसर्ग रोखायचा असेल तर नागरिकांनी आता स्व:ताहून नियमांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन कऱणे अपेक्षित आहे. आता सार्वजनिक ठिकाणीही असे नियम न पाळणार्‍या नागरिकांवरील कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारनेरमधील 43 गावात लॉकडाऊन

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल पारनेर तालुक्याला भेट देत करोनाचा आढावा घेत तालुक्यातील संवेदनाशील 43 गावे 8 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यात महिनाभरापासून करोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून सरासरी 100 ते 150 नवे रुग्णसमोर येत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी काल तालुक्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला. यात ज्या गावात मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत, अशा 43 गावात 8 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला.

शेवगावमध्ये मंगल कार्यालय सील

शेवगाव येथील तालुका प्रशासनानेही एका ठिकाणी लग्न समारंभ सुरु असून नियमांपेक्षा जास्त गर्दी जमल्याची माहिती मिळताच पथकामार्फत तेथे कारवाई केली. संबंधित मंगलकार्यालयाचा मालक आणि वधू-वर आणि त्यांचे आई वडील यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा बुधवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडकपणे राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्ह्याच्या विविध भागात स्थानिक प्रशासनाने मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिग न पाळणे याबाबतही अनेक ठिकाणी कारवाई करुन दंड वसूल केला.

Related Stories

No stories found.