करोनासोबत डोक्याला डेंग्यू, चिकुनगूणाचा ताप

ऑगस्ट महिन्यांत अचानक रुग्ण वाढले : खासगी रुग्णालय हाऊसफुल
करोनासोबत डोक्याला डेंग्यू, चिकुनगूणाचा ताप

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात करोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नसतांना आता किटकजन्य आजारांनी अचानक डोेकवर काढले आहेत. यामुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यांत डेंग्यूसोबत, चिकुनगूणीया, गोचिड ताप आणि व्हायरलचे प्रमाण वाढले आहे. यामुळे खासगी दवाखाने हाऊसफुल झाले असून नागरिक ही त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, जिल्हा हिवताप विभागाने जिल्हाभरात हिवताप, डेंग्यू, चिकुनगूणयाच्या चाचण्या वाढविण्याच्या सुचना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भिज पाऊस झालेला असून यातून गवत वाढल्याने आणि पाण्याची तळी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे अचानक ऑगस्ट महिन्यांत किटजन्य आजारांचा उद्रेक झालेला आहे. मात्र, काही असले तरी जिल्ह्यातील नागरिक करोनापाठोपाठ आता डेंग्यू, चिकुनगूणीया, गोचिड ताप आणि व्हायरल तापामुळे त्रस्त आहे. सध्या जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करोना उपचार, लसीकरण आणि चाचण्यावर भर देण्यात येत आहे. नगरला जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्य आजारांवर उपचार करण्यात येत असून उर्वरित ठिकाणी नागरिकांना खासगी आरोग्य संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. त्याठिकाणी आवाच्या सव्वा पैसे देवून उपचार घेण्याची वेळ आली आहे.

जिल्हा हिवताप विभागाकडील आकडेवारीनूसार जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्टअखेर 3 लाख 17 हजार 566 रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आलेले असून यात एकाला हिवताप, डेंग्यूसाठी 256 संशयीतांचे नमुने घेण्यात आले असून यात 52 जणांना डेंग्यू झाल्याचे निदान घालेले आहे. यात एकट्या ऑगस्ट महिन्यांत 40 जणांचा समावेश आहे. यासह चिकुणगूणीयाचे 22 रक्तजल नमुने घेण्यात आलेले असून यात 20 जणांना बाधा झालेली आहे. तर एनस वनचे 146 रुग्ण आढळलेले आहे. ही सरकारी आकडेवारी असली तरी खासगी प्रयोग शाळांच्या अहवालात जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुणगूणीया, गोचिड ताप आणि व्हायलरने बाधित असणार्‍यांची संख्या मोठी आहे.

जिल्ह्यात सध्या डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण वाढलेले आहेत. रुग्णालयात येणार्‍या एकूण रुग्ण संख्येपैकी किमान 25 ते 30 टक्के रुग्ण हे डेंग्यू आणि व्हायरलने बाधित आहेत. यासह कोविड रुग्णांची संख्या देखील लक्षणी आहे. यामुळे नागरिकांनी प्राथमिक स्तरात हे आजार होवून न देणे आणि झाल्यानंतर लक्षणानूसार तातडीने उपचार करून घ्यावेत. कोविडसाठी लसीकरण, तपासणी आणि उपचार हे महत्वाचे असून मास्क वापरणे, विलगीकरण हे महत्वाचे आहे.

डॉ. पियुष पाटील, फिजीशयन, नगर.

नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखावी, एक दिवस कोरडा पाळावा, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, पाण्याची डबकी होणार याची दक्षता घ्यावी, तसेच लक्षणानूसार योग्य तपासणी उपचार केल्यास किटकजन्य आजार टाळात येतील. तसेच जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये चाचण्या वाढविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा हिवताप अधिकारी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com