अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या वारसांना जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे.

अनुकंपा तत्वावर 27 पदे भरली जाणार आहेत. याची प्रक्रिया येत्या आठ दिवसांमध्ये केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पोलीस भरती बाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात नगर जिल्ह्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात पोलीस कर्मचार्यांची संख्या कमी आहे. शासनाने भरती सुरू केली आहे. यातून काही पदे जिल्ह्याला मिळतील.

करोना काळात कर्तव्य बजावत असताना जिल्हा पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना पोलीस दलात नोकरी देण्यासाठीची प्रक्रिया आठवडाभरामध्ये केली जाईल. जिल्हा पोलीस दलात अनुकंपा तत्वावर 27 पदे भरली जाणार आहेत. जिल्हा पोलीस दलातील मयत झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वारसांना पोलीस दलात संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सुमारे तीन हजार पोलीस करोना काळात अहोरात्र मेहनत घेत होते. सुरूवातीच्या काळात जिल्ह्यातील पोलिसांना करोनाचे संक्रमण झाले नव्हते. परंतु, जिल्ह्यात करोना रूग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस दलातही करोनाने शिरकाव केला होता. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसांना पोलीस दलात स्थान मिळणार आहे.