करोनाने मृत्युमुखी पडलेल्या वारसदारांनी राहुरी कार्यालयाशी संपर्क साधा - ना. तनपुरे

करोनाने मृत्युमुखी पडलेल्या वारसदारांनी 
राहुरी कार्यालयाशी संपर्क साधा - ना. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

करोनाने मृत्युमुखी (Corona Death) पडलेल्या वारसदारांनी राहुरीतील (Rahuri) कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी केले आहे.

करोनामुळे मृत्युमुखी (Corona Death) पडलेल्या मयताच्या वारसांना (Heir) 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली आहे. या योजनेचा लाभ संबंधित कुटुंबियांनी घ्यावा, असे आवाहन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी केले आहे. अधिक माहिती देताना मंत्री तनपुरे यांनी सांगितले, राज्यामध्ये करोना सारख्या महामारीने अनेकांचे बळी गेले. यासंदर्भात राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना आणली.

राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) जवळपास 400 पेक्षा अधिक रुग्णांचा करोनामुळे बळी गेला आहे. संबंधित कुटुंबांना आर्थिक सहाय्य देऊन मदत केली जाणार आहे. यासंबंधीचे लागणारे कागदपत्र राहुरीतील संपर्क कार्यालयात आणून द्यावे. या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संपर्क कार्यालयात येऊन आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com