मिरावली पहाड दर्गा दर्शनाबाबत ट्रस्टने घेतला 'हा' निर्णय...

करोना निर्बंधांमुळे (Corona restrictions) हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली दर्गा पहाड येथील दर्गा गेल्या दीड वर्षांपासून दर्शनासाठी बंद आहे.
मिरावली पहाड दर्गा दर्शनाबाबत ट्रस्टने घेतला 'हा' निर्णय...

अहमदनगर | Ahmednagar

धार्मिक स्थळे शासनाच्या आदेशाने बंद असल्याने कोणीही हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली दर्गा पहाड (Mirawali Dargah Pahad Ahmednagar) येथील दर्शनसाठी परिसरात येऊ नये, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

करोना निर्बंधांमुळे (Corona restrictions) हजरत सय्यद इसहाक पिर मिरावली दर्गा पहाड येथील दर्गा गेल्या दीड वर्षांपासून दर्शनासाठी बंद आहे. दर्गा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद आहे. नित्य नियमानुसार गुसल देणे, फातेहा आदी विधीसाठी 1 मुजावर व 4 व्यक्तींनाच थांबता येते. जागृत दर्गावर श्रद्धा असलेले भाविक हे महाराष्ट्रसह परप्रांतातून येत असतात. शासनाच्या करोना निर्बंधांनुसार दर्गा दर्शन बंद असल्याने भाविकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com