जिल्ह्यात रविवारी 25 करोनाबाधित; नगरमध्ये 14
सार्वमत

जिल्ह्यात रविवारी 25 करोनाबाधित; नगरमध्ये 14

अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 125

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढण्याचा सिलसिला सुरूच असून, रविवारी जिल्ह्यात 25 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक 14 रुग्ण नगर शहरातील आहेत. नगरमध्ये आता सावेडीतील पद्मानगर, ढवणवस्ती भागातही रुग्ण आढळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 10 रुग्णांनी रविवारी करोनावर मात केली असून 70 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्यांमध्ये संगमनेर (05), नगर शहर (02), पारनेर, नगर आणि अकोले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 283 इतकी झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी 25 जण करोनाबाधित आढळले असून, तेवढ्या रुग्णांची भर पडली आहे. नगर शहरातील 14, संगमनेर तालुक्यातील 06, भिंगार येथील दोन, नवनागापूर येथील एक आणि अकोले व पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

संगमनेर तालुक्यात कुरण येथे 02, पिंपरणे आणि साकूर येथे 01 आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला. नगर शहरात सिद्धार्थनगर, केडगाव, तोफखाना, केडगाव, पाईपलाईन रस्त्यावरील पद्मानगर, ढवणवस्ती, आडतेबाजार या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आलेला होता. पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आला. यामुळे जिल्ह्यात अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 125 झाली असून, आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 14 व जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या 422 एवढी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com