Corona Paitent Discharge
Corona Paitent Discharge
सार्वमत

नगर - जिल्ह्यातील ८ रुग्णांची करोनावर मात; ६५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

नगर शहर ४, श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाचा समावेश

Nilesh Jadhav

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील ८ रुग्णांनी करोनावर मात केली.

यामध्ये नगर शहर ४, श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला आज डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी ६५ व्यक्तींचे करोना चाचणी अहवाल निगेटिव आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com