...अनं खासदार साहेबांचा तोल गेला

'त्या' उद्धगारामुळे सर्वच अवाक

नेवासा बुद्रुक | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील करोना संदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज गुरुवारी नेवासा पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत वंचीत आघाडीचे संजय सुखदान यांनी खासदारांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला.

यावेळी तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप केला व सुखदान यांच्या हातून शाईची बॉटल घेतली. यानंतर गट विकास अधिकारी साहेब यांच्या दालनात सविस्तर चर्चा सुरू असताना शाब्दिक चकमकीत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या तोंडून निघालेल्या उद्धगारांनी सर्व अवाक झाले. खासदार लोखंडे म्हणाले, 'मी देखील दलित आहे, मी काय ब्राह्मणांच्या घरातील नाही' असा शब्द खासदार लोखंडे यांच्या तोंडून गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Title Name
'अजित पवार, जास्त गमजा करू नका!'; चंद्रकांत पाटलांनी बजावले
...अनं खासदार साहेबांचा तोल गेला

खासदार लोखंडे यांचे हें शब्द काही वेळ चर्चेचा विषय बनले होते. आढावा बैठक झाल्यानंतर खासदार लोखंडे यांनी तत्काळ सभापती यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन सदरील विषयावर पडदा टाकला व अनावधानाने शब्द गेला असल्याची खंत व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com