सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र

5 एप्रिल रोजी होणार परीक्षा
सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र

नेवासा |ता. प्रतिनिधी| Newasa

महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांची नामतालिका बनविण्याकरीता घेण्यात येणार्‍या परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र ठरले असून 5 एप्रिल 2023 रोजी लेखी परीक्षा होणार आहे.

सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र
विजेची तार गोठ्यावर पडल्याने एक गाय व म्हशीचा मृत्यू

संचालकांचे नवीन पॅनेल बनविणेसाठी घेण्यात येणार्‍या परिक्षेसाठी प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी इंदलकर समितीच्या आकृतिबंधामध्ये पद बसत नसल्याचे कारण देत 190 उमेदवार अपात्र ठरविण्यात आले होते.

साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकपदासाठी एकूण 448 अर्ज प्राप्त झालेले होते. निकषांमध्ये न बसणारे 190 उमेदवार अर्ज अपात्र ठरल्याने 258 परीक्षार्थी राहिले आहेत. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे यांच्या मा़र्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र
अजित पवार ठरवणार आज जिल्हा बँकेचा नवा अध्यक्ष

पात्र झालेल्या उमदेवारांची पहिल्या टप्प्यातील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी चाळणी परीक्षा दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येईल. परिक्षेसाठी आवश्यक असणारी प्रवेशपत्रिका अर्जावर नमुद केलेल्या ईमेल आयडीद्वारे पाठवली जाणार आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था गणेशखिंड रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ, पुणे येथे परिक्षेचे केंद्र असेल. परिक्षेची वेळ दु. 2 ते 4 असा 2 तासाचा कालावधी असून एकुण 200 गुणांची परीक्षा असून त्यासाठी एकुण 100 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत.

सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र
शेतकऱ्यांची खरीपाच्या संकटानंतर अवकाळीमुळे रब्बीची पिकेही संकटात

साखर आयुक्तालयाचे संचालक (प्रशासन) उत्तमराव इंदलकर समितीने सहकारी साखर कारखान्यांसाठी गठीत केलेल्या सुधारित आकृतीबंधांमध्ये खाते प्रमुख-विभाग प्रमुखांची व्याख्या करतांना केवळ जनरल मॅनेजर किंवा सेक्रेटरी,वर्क्स मॅनेजर किंवा चीफ इंजिनिअर,प्रॉडक्शन मॅनेजर किंवा चीफ केमिस्ट,फायनान्स मॅनेजर किंवा चीफ अकाउंटंट व कृषी मॅनेजर किंवा मुख्य शेतकी अधिकारी ही पाचच पदे खाते प्रमुख-विभाग प्रमुख या व्याख्येत घेतलेली आहेत.

त्यामुळे या पाच पदांव्यतिरिक्त इतर पदे अपात्र ठरविली गेली आहेत. अपात्र थरविलेले बहुतांश उमेदवार हे डिस्टिलरी मॅनेजर,लीगल ऑफिसर,कार्यलयीन अधीक्षक,स्टोअर किपर, मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट, लॅब केमिस्ट, पर्चेस ऑफिसर,सेफ्टी ऑफिसर,डेप्युटी चीफ केमिस्ट, मेडिकल ऑफिसर,इडीपी मॅनेजर,कंप्यूटर ऑपरेटर,लेबर ऑफिसर, लेबर वेल्फेअर ऑफिसर,सुरक्षा अधिकारी,कार्या लयीन अधीक्षक,पर्यावरन अधिकारी आदि पदे इंदलकर समितीने सुचविलेल्या आकृतीबंधानुसार उमेदराने अर्जात नमूद केलेले पद विभागप्रमुख, खातेप्रमुख नसल्याने सदर अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत.

अपात्र उमेदवारांची न्यायालयीन लढाईची...

सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणेसाठी घेण्यात येणार्‍या परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यासाठी दि. 31 मे 2022 रोजी साखर आयुक्तालयाने दिलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता व अनुभव या विषयीच्या शर्ती-अटी नमूद करतांना उमेदवार हा कृषी शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, वाणिज्य शाखेचा पदव्युत्तर पदवीधर, बी. ई. (मेकॅनिकल/ केमिकल / इलेक्ट्रीकल ), एम. एस्सी. (वाईन ब्रिवींग अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी), चार्टर्ड अकौंटंट, आय. सी. डब्ल्यू. ए., कंपनी सेक्रेटरी, एम.बी.ए. (फायनान्स), एम. बी. ए. (एचआर), किंवा साखर कारखान्यात विभागप्रमुख /खातेप्रमुख म्हणून सध्या काम करणार्‍या- यापूर्वी काम केल्याचा अनुभव असणार्‍या उमेदवारांसाठी किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक. सद्यस्थितीत साखर कारखान्यात किमान 5 वर्षे कार्यरत असणार्‍या उमेदवारांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) व संबंधित साखर कारखान्याच्या लेटर हेडवर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे प्रमाणिकरण सादर करणे आवश्यक व मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक अशी पात्रता नमुना केली होती. त्यात कोठे ही इंदलकर समितीने सुचविलेल्या आकृती बंधानुसार उमेदराने अर्जात नमूद केलेले पद विभागप्रमुख, खातेप्रमुख नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल असे म्हंटलेले नाही.त्यामुळे अर्ज अपात्र ठरत नाहीत अशी भूमिका घेऊन अपात्र उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com