भाजप जिल्हाध्यक्षांची शिफारस; नव्या सहकारी संस्थेची नोंदणी

सहकार मंत्री सावे यांची नगरमध्ये घोषणा
भाजप जिल्हाध्यक्षांची शिफारस; नव्या सहकारी संस्थेची नोंदणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

काही वर्षांपासून राज्यातील नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे काम बंद करण्यात आले होते ते काम आम्ही परत सुरू करत आहोत. नव्या सहकारी संस्थाची मान्यता थेट मंत्रालयातून होणार असून यासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची शिफारस लागणार आहे, अशा मोठ्या निर्णयाची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी गुरूवारी शहर भाजपच्या बैठकीत केली.

मंत्री अतुल सावे नगर शहराच्या दौर्‍यावर आले असता दुपारी भाजपच्या कार्यालयात त्यांनी शहरातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यानी मंत्री सावे यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ नेते अभय आगरकर, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सुवेंद्र गांधी, तुषार पोटे, महेश नामदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. मंत्री सावे म्हणाले, राज्यात सत्तांतर झाले, त्यावेळी मनिध्यानी नसतांना देवेंद्र फडणवीस यांनी सहकार सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मला दिली.

भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा पक्ष आहे. राज्यात सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टी मागे आहे. त्यामुळे आता राज्यात मोठ्याप्रमाणात पक्ष सहकार क्षेत्रात सक्रिय होत अनेक बंद पडलेले साखर कारखाने ताब्यात घेत आहे. अनेक वर्षापासून सहकार संस्थांची नव्याने नोंदणी बंद होती. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकारमध्ये प्रवेश मिळत नव्हता. म्हणून हे सरकार ही बंदी उठवत असून स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षाची शिफारसीने नव्या सहकारी संस्थांना मंजुरी मिळणार आहे. प्रत्येक गावात सहकारी सोसायटी सुरु करण्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.

पूर्वीच्या अटल अर्थ सहाय्य योजना प्रमाणे हे काम चालणार आहे. तसेच ज्या कार्यकर्त्यांना सहकारी बँकांचे सभासद होयचे आहे त्यांनी माझ्याकडे यावे. मी संबंधित बँकेला भाजपच्या कार्यकर्त्याला सभासदत्व देण्यास सांगतो. सहकार क्षेत्रात भाजपाचे काम भविष्यात वाढणार आहे. सहकार क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले होते. ते स्वच्छ करण्याचे काम केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा करत आहेत. तेच काम राज्यातही सुरु आहे. लवकरच सर्व सहकारी संस्थांचे कामे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी खप महत्वाचे निर्णय घेत समाजास न्याय देत आहे. प्रास्ताविकात गंधे म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले अतुल सावे यांनी पक्षाचे एकनिष्ठेने काम केल्याने फडणवीस यांनी त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला आहे. पारदर्शी व स्वच्छ कारभार करत मंत्री सावे राज्यातील सहकार क्षेत्र स्वच्छ कर आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा. यावेळी वसंत राठोड, नरेंद्र कुलकर्णी, तायगा शिंदे, गोकुळ काळे यांनी समस्या उपस्थित केल्या. यावेळी विविध पदावर नियुक्ती झालेले दामोदर बठेजा, वसंत राठोड, किशोर कटोरे आदींचा सत्कार मंत्री केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com