Coronavirus : जिल्ह्यात आज पाचशेहून अधिक रुग्णांची नोंद

एकट्या पारनेर तालुक्यातच १११ नवे रुग्ण
Coronavirus : जिल्ह्यात आज पाचशेहून अधिक रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात शनिवारी 378 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनातून बरे झालेल्यांची संख्या आता 2 लाख 78 हजार 852 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.81 टक्के झाले आहे. दरम्यान, काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 590 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 150 इतकी झाली आहे. काल पारनेर तालुक्याने करोनाचे पुन्हा शतक गाठले असून संगमनेरचा आकडा ही 99 आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 35, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 192 आणि अँटीजेन चाचणीत 363 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 3, नगर ग्रामीण 2, पारनेर 13, पाथर्डी 1, राहता 1, राहुरी 1, संगमनेर 11, शेवगाव 1, श्रीगोंदा 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 15, अकोले 9, जामखेड 6, कर्जत 9, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 10, नेवासा 8, पारनेर 15, पाथर्डी 5, राहता 4, राहुरी 5, संगमनेर 57, शेवगाव 21, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 8, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 8 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 363 जण बाधित आढळुन आले. मनपा 10, अकोले 15, जामखेड 17, कर्जत 53, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 30, नेवासा 8, पारनेर 83, पाथर्डी 19, राहता 5, राहुरी 14, संगमनेर 31, शेवगाव 19, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 6 आणि इतर जिल्हा 25 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 16, अकोले 22, जामखेड 33, कर्जत 31, कोपरगाव 22, नगर ग्रामीण 13, नेवासा 4, पारनेर 52, पाथर्डी 20, राहता 27, राहुरी 17, संगमनेर 45, शेवगाव 8, श्रीगोंदा 38, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com