वादग्रस्त स्टेटस; युवकाविरूध्द गुन्हा

कोतवाली पोलिसांत फिर्याद
वादग्रस्त स्टेटस; युवकाविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वादग्रस्त स्टेटस व्हाट्सअ‍ॅपला ठेवल्याप्रकरणी एका युवकाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत चंद्रकांत ढाणके (वय 20 रा. प्रशांत सोसायटी, शिवाजीनगर, कल्याण रस्ता, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई उमेश दगडू शेरकर यांनी फिर्याद दिली आहे. समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्यासाठी सोशल मीडियावर पोलिसांची नजर आहे. त्यानुसार कोतवाली गोपनीय शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र गर्गे, पोलीस नाईक सिताराम खामकर, पोलीस शिपाई शेरकर हे सोशल मीडियावरील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपची तपासणी करत असताना अनिकेत ढाणके याने त्याच्या व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन व्देषाची भावना तयार होईल व सामाजिक शांतता भंग होईल, असा व्हिडिओ ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यानंतर शेरकर यांच्या फिर्यादीवरून ढाणकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com