
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कंपनीतील ठेकेदाराकडे एक लाखाच्या खंडणीची मागणी करणार्या दोघांविरूध्द येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. शैलेंद्र बलीराम चक्रवर्ती (वय 40 हल्ली रा. शिवाजीनगर, नवनागापूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.
किरण शिंदे व विशाल कापरे (पूर्ण नाव माहिती नाही, दोघे रा. नवनागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी (दि. 3) रात्री गुन्हा दाखल होताच सहा.पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने किरण शिंदे याला ताब्यात घेत अटक केली असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. 1 ऑक्टोबर रोजी चक्रवर्ती हे त्यांच्या एमआयडीसीतील रूषार इंजिनिअरींग कंपनीच्या गेटच्या बाहेर असताना त्यांच्याकडे किरण व विशाल यांनी एक लाखाची मागणी केली.
पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच 2 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता चक्रवर्ती यांच्या घरात घुसून पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिली. साडे आठच्या सुमारास गरवारे चौकातील मेडिकल स्टोअर जवळ चक्रवर्ती यांना धक्काबुक्की करून खिशातून 10 हजारांची रक्कम काढून घेतली. आणखी पैेसे दे नाही तर तुला जिवे ठार मारू, असा दम देऊन शिरसाठ व रोहन कोल्हे यांच्या मोबाईल वर फोन पे वरून 50 हजार रुपये घेतले व ते एटीएममधून काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार दीपक पाठक अधिक तपास करीत आहेत.