... तर दूषित पाण्याने आयुक्तांना आंघोळ घालू

पाणी प्रश्नावरून नितीन भुतारे यांचा इशारा
... तर दूषित पाण्याने आयुक्तांना आंघोळ घालू

अहमदनगर | प्रतिनिधी

पंधरा दिवसांपासून शहरातील अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे अनेक लोकांना दूषित पाणी पिण्यामुळे आजाराला सामोरे जावे लागत आहे. जनतेचा संयम आता संपलेला आहे. दोन दिवसांत दूषित पाणीपुरवठा बंद न झाल्यास त्याच पाण्याने महापालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना आंघोळ घालू, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.

दूषित पाणीपुरवठ्याबाबत मनसे आक्रमक झाली आहे. त्याबाबत भुतारे यांनी अभियंता रोहिदास सातपुते यांच्यांशी तसेच सहाय्यक अभियंता राहुल गीते यांच्याशी संपर्क करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन भुतारे यांनी वरील इशारा दिला आहे.

शहरातील अनेक भागांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी करूनही मनपा अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. महापौर, आमदार यांनी संबंधित भागाला भेटदेखील दिली नाही हे एक दुर्दैव आहे. नगरसेवकही लक्ष देत नाहीत. त्यांना जनतेच्या आरोग्याचे काही देणेघेण नाही, असा आरोप करून भुतारे म्हणाले की, समस्या न सुटल्यास येणाऱ्या काळात मनसेच्या माध्यमातून संबंधित नागरिक महानगरपालिकेच्या दालनात आंदोलन करतील याची नोंद महानगरपालिकेने व पोलिस प्रशासनाने घ्यावी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com